‘वैनतेय’ या साप्ताहिकातून वि. स. खांडेकर यांनी विविध सदरांतून विविध प्रकारचं लेखन केलं. त्यातील ‘कणसाचे दाणे’, ‘बहुरत्ना वसुंधरा’, कल्पनातरंग या सदरांतील काही लेखनाचं आणि ‘वैनतेय’साठी खांडेकरांनी लिहिलेल्या स्फुट सूचनांचं संकलन-संपादन ‘कल्पनातरंग’ या पुस्तकात करण्यात आलं आहे. यां पैकी ‘कणसाचे दाणे’मधून विज्ञान, व्यक्ती, विचार, भाषा, साहित्य, शिक्षण, राजकारण, इतिहास, भाषण, पर्यावरण, संस्कृती, देश, ग्रंथ, नियतकालि कं अशा कितीतरी विषयांना खांडेकरांनी स्पर्श केलेला आहे. ‘बहुरत्ना वसुंधरा’मधील लेखन विसंगतीवर बोट ठेवणारं आहे. उदा. १९२८-२९ या शैक्षणिक वर्षात अध्यापनात इंग्रजांनी `डायरेक्ट मेथड` वापरण्याच्या काढलेल्या फतव्यावर खांडेकरांनी मारलेले फटकारे.. एखादी छोटी कल्पना घेऊन त्याचा तरंग विस्तारित करणारं लेखन ‘कल्पनातरंग’ या सदरातून खांडेकरांनी आहे. ज्याला `संकीर्ण` म्हणता येईल अशा अनेक स्फुट सूचना, वार्तापत्रं, टिपांचा समावेश ‘स्फुट सूचना’ या सदरात केला गेला आहे.