Skip to product information
-
Media gallery Media gallery
'KAL'MAKER LIVE|‘काळ’मेकर लाइव्ह by Balasaheb Labde
Description
Description
बाळासाहेब लबडे हे सकस समकालीन भान असलेले, वास्तववादी, प्रयोगशील, नवकादंबरीकार आहेत. ‘काळ’मेकर लाइव्ह ही नव्या जाणीवेची, आशय, विषय, शैली यादृष्टीने नावीन्यपूर्ण कादंबरी आहे.मानवी मूल्यांचा र्हास; माणसामाणसांमधील दुभंग; धर्म-जात-पंथ-प्रांत-भाषा-रंग-शिक्षण-व्यवसाय अशा सर्व पातळ्यांवर विखंडीत होत गेलेला, परस्परांवरील विश्वास उडालेला, संशयग्रस्त, द्वंद्वात ढकलला गेलेला समाज ही रेखाटते.‘काळ’मेकर लाइव्ह हे जागतिकीकरणोत्तर समाजाचे चित्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेखाटते. अस्वस्थ रिकामपणाचा हा पट या कादंबरीला वेगळे परिमाण देतो.आभासी जग ही आजच्या तंत्रज्ञानाची निर्मिती आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक वास्तव जगापेक्षा आभासी जगात जास्त जगत आहेत. एका अॅपच्या माध्यमातून हे विषारी मायावी जग उभे करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.या कादंबरीला सकृतदर्शनी संगती नाही. एकसंगतता नाही. अॅपवर लोक लाइव्ह येतात, बोलतात, गातात, परफॉर्म करतात, टिप्पण्या करतात. आजचे आभासी वास्तव या पद्धतीने लेखकाने मांडले आहे. त्यासाठी अॅपची भाषा, जार्गन वापरले आहे. हा एक धाडसी प्रयोग आहे. यात संगती नसली, तरी अंतर्संगती आहे, ती जाणवते. यातून जगण्याला असलेला ठोसपणा लयाला जात असल्याची, जगण्याच्या विस्कळीतपणाची, मूल्यभान लोपल्याची जाणीव तीव्रपणे समोर येते. हे या लेखनाचे श्रेय म्हणता येईल.मराठी कादंबरीला नव्या दिशेला नेण्याचे काम ‘काळ’मेकर लाइव्हने केले आहे. आशयाभिव्यक्तीचे अनेक प्रकारचे संसूचन वाचकांपुढे निर्माण करणारी ही कलाकृती नव्याशैलीला साकार करणारी आहे. नव्या समीक्षापद्धतीची मागणी ही कलाकृती करते. --मनोहर सोनवणे, जेष्ठ साहित्यिक व संपादक
- Regular price
- Rs. 495.00
- Regular price
-
Rs. 550.00 - Sale price
- Rs. 495.00
- Unit price
- / per
-10%
Notified by email when this product becomes available
'KAL'MAKER LIVE|‘काळ’मेकर लाइव्ह by Balasaheb Labde