जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेचडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती !अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी.अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती,स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती…बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातीलहे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात.त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं…कलामांचं बालपण !