Skip to product information
1 of 2

Kahi Satya Kahi Kalpit by V V Bapat

Description

वि. वि. बापटसत्य हे अद्भुतापेक्षाही चमत्कृतिपूर्ण असते. [Truth is stranger than fiction] अशी म्हण आहे. आजच्या या विज्ञानयुगात कोणताही व कसलाही चमत्कार घडू शकतो, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. काल-परवा आपल्याला जी घटना, जो शोध अशक्यप्राय वाटत होता तो आपण आज अनुभवत आहोत. म्हणूनच आजच्या युगाला 'जेट युग' असे संबोधले जाते. रामायण महाभारत जैनपुराण अशा प्राचीन ग्रंथांत सत्य आणि कल्पित घटनांची रेलचेल आहे. भीमपुत्र घटोत्कचाने आकाशातून अनेक असे फेकून कोरववीरांची दाणादाण उडविली होती. आज विमानातून शत्रुपक्षांवर अणुबाँबसह अनेक विनाशक अस्त्रांचा मारा करून शत्रुपक्षाची दाणादाण उडविता येते. अशा प्रकारचे काही सत्य व काही कल्पित अशा अनेकानेक घटना माझ्या वाचनात आल्या. यातील काही घटना खरोखरच घडून गेलेल्या आहेत, तर काही कल्पनाविलास आहेत. उदाहरणार्थ 'परमेश्वराचा धाकटा भाऊ' ही कथा कल्पित असली तरी दुष्ट माणसे दुसऱ्याचे वाईट करण्यात किती तत्पर असतात, हे अनेकांना अनेक वेळा अनुभवास आलेले 'सत्य'च आहे. 'आणि साधू दोनदा हसला' हीही कथा कल्पित असली, तरी माणसाला पुढच्या क्षणाला काय होणार आहे, हे कळणे कसे अगम्य आहे, याचे दर्शन घडविणारे हे सत्यच आहे.
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Kahi Satya Kahi Kalpit by V V Bapat
Kahi Satya Kahi Kalpit by V V Bapat

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like