उर्दूच्या बंडखोर लेखिका इस्मत चुगताई सर्वच भारतीय भाषांतील वाचकांना आपल्याशा वाटतात. जितक्या उर्दू वाचकांना वाटतात.
जुन्या रूढीमध्ये अडकलेल्या समाजाला आणि त्याच त्या बुरसटलेल्या परंपरांना त्यांनी धक्का दिला आणि मनुष्य म्हणून विश्वास दिला, हे त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
आपल्या परिसराचा इतक्या सूक्ष्मतेने वेध घेणाऱ्या लेखिकेचे घडणे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. त्यामुळेच इस्मतआपाने आपल्या वाचकांसाठी ‘ कागदी पेहराव’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.’
‘कागदी पेहराव’ हे आत्मकथन असले तरीही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे व कादंबरीपेक्षाही खूप वेगळे यात आहे.
एककालपरत्वे आणि संपूर्ण समाजाचे विस्ताराने आणि प्रामाणिकपणे चित्रण यात आले आहे.
तीसच्या दशकात एका घरंदाज असेलेल्या कुटुंबात एका मुलीला शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागला असेल, हे वेगळ सांगाची गरज नाही. हा संघर्ष ह्या आत्मकथेचे केंद्र आहे.
यामुळे लेखिकेला सहन कराव्या लागलेल्या मानसिक दुखचा अंदाज वाचकांना करावा लागेल. कारण आपल्या दुखाच प्रदर्शन कारण, अत्मदयेची याचना करण हा इस्मतआपांचा मूळ स्वभावच नाही.