Skip to product information
-
Media gallery
Media gallery
1
/
of
1
Kadambarivishayi by Harishchandra Thorat
Description
Description
डॉ हरिश्चंद्र थोरात हे जसे आधुनिक समीक्षासिद्धान्तव्यूहाचे अभ्यासक आहेत, तसेच ते कादंबरी या साहित्यप्रकाराचेही मर्मज्ञ अभ्यासक आहेत.
कादंबरीचा आशय, त्या आशयाला असलेले अनेकविध सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ यांची जशी ते सूक्ष्म छाननी करतात, तशीच ते कादंबरीची कथनतंत्रे, तिची संरचना यांचीही विस्ताराने चिकित्सा करतात. त्यांच्या या कादंबरीचिकित्सेला 1960 नंतरच्या संरचनावाद, कथनमीमांसा,मनोविश्लेषणवाद, संवादवाद या पाश्चात्त्य सिद्धान्तव्यूहांचा संदर्भ आहे. डॉ. थोरातांचा कादंबरीचा हा अभ्यास केवळ आशय, केवळ तंत्रे वा केवळ संरचना यांचा अभ्यास राहत नाही.
त्याला कादंबरीच्या समग्रतेचा संदर्भ प्रापत होतो. त्यांचे कादंबरीविषयी हे नवे पुस्तक याचा प्रत्यय देणारे आहे. वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या निमित्ताने कादंबरीविषयी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे, हे खरे. परंतु या सर्व विवेचनाच्या गाभ्याशी ‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार आहे. या वेगवेगळ्या लेखांमध्ये या प्रकाराच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कादंबरीविषयीच्या त्या त्या प्रश्नाच्या संदर्भात डॉ. थोरात विशिष्ट कादंबरीचा वा कादंबरीकाराचा परामर्श घेतात. कादंबरी या प्रकारासारखीच कादंबरीवरील मोकळीढाकळी चर्चा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यामुळे हे पुस्तक कादंबरी या प्रकाराविषयीच नव्हे, तर आधुनिक मराठी साहित्य, समाज व संस्कृती यांविषयीही मर्मदृष्टी देणारे आहे.
- Regular price
- Rs. 158.00
- Regular price
-
Rs. 175.00 - Sale price
- Rs. 158.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Kadambarivishayi by Harishchandra Thorat
