श्री. वि. शं. चौघुले हे एका मोठ्या वाडमयीन कालखंडाचे साक्षीदार आहेत. एका भाग्यवान पिढीबरोबर वाढताना त्यांचे विध्यार्थीजीवन व पुढील जीवन समृद्ध झाले. एका अर्थाने चौघुले नशीबवान आहेत.
चौघुले यांचा स्वभाव नम्र आणि माणसं जोडणारा आहे. भेटलेल्या प्रत्येक माणसाचा स्नेह त्यांनी आयुष्यभर जपला. अनेकांविषयी त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. यामुळेच त्यांनी हे सर्व लेख अतिशय मनापासून व आत्मीयतेने लिहिले आहेत.
अनंत काणेकर, रमेश तेंडूलकर, जयवंत दळवी, म. द. हातकणगलेकर अशा अनेकांच्या भेटीमुळे त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. भेटलेली ही जिव्हाल्यची माणसं, त्यांनी येथे चित्रित केली आहेत. ती केवळ व्यक्तिचित्रे नाहीत. चौघुले यांच्या जीवनाचा भागच बनलेल्या माणसांविषयी त्यांनी भरभरून लिहिले आहे