भाऊसाहेब पाटणकरअॅडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर महाराष्ट्रातील एक सुप्रसिध्द व्यक्तिमत्व दिल्ली ते हैद्राबादपर्यंत 'मराठी शेरोशायरी' च्या शेकडो मैफिली आत्मविश्वासानं जिंकणारा एकमेव कलंदर. शिकार, संगीत, अध्यात्म अशा वेगवेगळया क्षेत्रात समरसून जाणारा, उर्दू काव्याचा कैफ मराठी भाषेत निर्माण करणारा एक विलक्षण जिंदादिल. श्रृंगार ते अध्यात्मापर्यंत जीवनाच्या विविध टप्यांची वाटचाल रसिकतेनं आणि डोळसपणे करणारा एक वाटसरू.त्यांच्या कवितेत उर्दू कवितेची आहे पण तिथी 'लगन' मात्र अस्सल 'मन्हाटी' शी आहे. त्यांची चितनशीलता प्रत्येक घेरातून जाणवते, नव्हे प्रत्येक रसिक हृदयाचा ठाव घेते. 'मराठी शायरी', 'मराठी मुशायरा', 'मैफिल' आणि मदोस्त हो वा पूर्वीच्या कलाकृतीना भाग्यवंत रसिकांनी अमाप दाद दिली. आता 'जिंदादिल' ही रसिकांची अशीच वाहवा पेईल.