साहित्य, कला, संस्कृती, समाज, राजकारण, शिक्षण, अध्यात्म, प्रबोधन अशा जीवनाच्या विविध अंगांना प्रभावीपणे स्पर्श करणारे साने गुरुजींचे जीवन हे योग्याचे जीवन होते. योगी परिपूर्ण असतो, परंतु अलिप्त असतो. गुरुजीही असेच होते. ते अनासक्त राहिले आणि समाजाला सर्वस्व देत देत निघून गेले आणि म्हणूनच पू. विनोबाजींनी ह्या अमृतपुत्राला तुकारामादिकांच्या मालिकेत बसवले. भाषा, भावना, विचार, वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या सर्वांचा अनोखा संगम असणारा असा जीवनयोगी विरळा