शेकडो हजारो वर्षांपासून जगाच्या विविध प्रदेशांमधून विविध धर्मांचे, विविध संस्कृतींचे लोक भारतातील समृद्धीने आकर्षित होऊन येथे आले आणि स्थायिक झाले. यातील काही सत्ता कमावण्यासाठी, काही नोकरी-व्यवसायासाठी तर काही धर्मप्रचारासाठी आले. येथे सत्ता कमावताना आणि ती राखताना अनेकांनी येथील स्थानिकांशी राजनैतिक धूर्तता आणि क्रूरतेने व्यवहार केले. परंतु त्यातील अनेकांनी त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांसाठी कितीतरी चांगले कार्यही केले, अनेक येथेच स्थायिक होऊन भारतीय भूमीशी एकरूप झाले. अशा भारतप्रेमींपैकी अनेक जण आता विस्मृतीत गेले आहेत. या भारतप्रेमींच्या मौलिक योगदानाचा आढावा.