जावईबापू म्हणजे राजबिंडेच! पण त्यांच्या डोक्यात काय भरले होते, कुणास ठाऊक! कांदेबटाटे की नर्मदेतले गोटे? अशा ह्या उडाणटप्पू जावईबापूंचे एकदाचे लग्न झाले. दिवस पालटू लागले. दिवाळी आली. आणि जावईबापूंना सासऱ्यांकडून दिवाळसणाचे आमंत्रण आले. वडिलांनी त्याला सांगितले, “तू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण गेण्यासाठी त्यांनी तुला बोलावलं आहे.” जावईबापूंच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटली. आपल्या अकलेचे दिवे तो पाजळू लागला. वडिलांनी त्याला पढवूनपढवून सासुरवाडीला पाठवले. त्यानंतरच्या झालेल्या धमाल गोष्टी वाचा ‘जावईबापूंच्या गोष्टी’ मध्ये.