Skip to product information
-
Media gallery Media gallery
Jahirnama By Narayan Surve
Description
Description
आधुनिक मराठी कविता एका वर्गाचीच भाषा बोलत होती. मध्यमवर्गाची! मर्ढेकरांनी आपल्या तिरकस अभिव्यक्तीने वैफल्य व्यक्त केले ते त्याच वर्गांचे! वरिषा साहित्यातही असतात आणि नारायण सुर्वे, त्यांच्या वर्गाची भाषा, अनुभव बोलत होते, पण त्यात वैयक्तिकतेचाही एक सूर होता. नारायण सुर्वे हा माणूस त्यातून दूर राहत नव्हता. आत्मविकासाच्या त्या अवस्थेत तसे होणेही शक्य नव्हते. काहीसे वैयक्तिकतेत कुठून घेणारे नारायण सुर्वे आता वेगळीच भाषा बोलत आहेत. त्यांचा 'जाहीरनामा'च मुळी 'आजच्या नावाने आणि आजच्या दुःखाच्या नावाने' पुकारला जात आहे. त्यातील हा प्रक्षुब्ध नवागत गतीचे टोक धरून युगाची भाषा बोलत आहे. व्यक्तिगत सुखदुःखाचे कढ उमाळे रुंदावून आता समष्टीशी जोडले जात आहेत. येत आहे ती निखळ, व्यापक जनजीवनाची सखोल जाणीव आणि ती व्यक्त करणारा स्वाभाविक उच्चार... सुकाणू सुटलेल्या अवस्थेत भरकटणाऱ्या गलबताची तिची अवस्था नाही. तिची भूमिका, तिची दिशा सारे निश्चित आहे. व्यापक जनजीवनाला कवेत घेणारी ही नजर तितकीच धारदार, तिखट आहे आणि एकूण मराठी कवितेला हे सारेच नवीन आहे. म्हणूनच केशवसुत, मर्ढेकर आणि नारायण सुर्वे ही मराठी कवितेची वळणे आहेत. मागच्या पिढ्यांनी आता आपले धुरकटलेले चष्मे जरा पुसूनच घेतले पाहिजेत...घ्यावेत. सूर्यकुल विस्तारत आहे आणि नव्या सूर्ययुगाचा 'जाहीरनामा' लिहिला जात आहे... उद्यासाठी.
- Regular price
- Rs. 95.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 95.00
- Unit price
- / per
-0%
Notified by email when this product becomes available
Jahirnama By Narayan Surve