१९३८ ते ५८ हा गोल्डन एज ऑफ सायन्स फिक्शनचा काळ. या काळातील निवडक विज्ञानकथांचा श्री. निरंजन घाटे यांनी अनुवाद केलेला आहे.भविष्यकाळात घडू शकणारी, आणि विज्ञानाला धक्का न लागू देणारं, नवतंत्रज्ञान – नवविज्ञान कल्पून ह्या कथांत मांडण्यात आलं आहे.ह्या कथा वाचून या कथांच्या प्रभावाने अनेक मराठी कथाकारांनी विज्ञानकथा लिहिण्यास प्रारंभ केला आहे.विज्ञानकथांच्या अभ्यासकांसाठी या कथासंग्रहातील कथा उपयुक्त ठरतील.