विज्ञानजतात घडणाऱ्या घटनांविषयी सर्वांनाच कुतूहल असते. त्यात वैज्ञानिकांच्या जीवनाविषयी जाणून घेणे तर पर्वणीच ठरते. चारचौघांसारखी वाटणारी ही माणसे असामान्य ध्येयाने प्रेरित असतात.स्वाभिमान, साधेपणा, कामावर श्रद्धा आणि कामात झोकून देण्याची तयारी, आत्मविश्वास, चिकाटी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मार्ग काढण्याची वृत्ती असे अनेक गुण शास्त्रज्ञांमध्ये असतात. त्यांच्याविषयी वाचून आपल्याला ज्ञान, प्रेरणा तर मिळतेच शिवाय काहीतरी करून दाखवायची जिद्दही निर्माण होते. ‘जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्से’ या पुस्तकात सी. व्ही. रमन, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा, बिरबल सहानी, जयंत नारळीकर, ए.पी.जे. अब्दल कलाम, सॅम पित्रोदा तसेच विजय भटकर या भारतीय शास्त्रज्ञांबरोबर अनेक पाश्चात्त्य शास्त्रज्ञही भेटतात. त्यांच्या आयुष्यातील रंजक प्रसंग मनोरंजन करण्याबरोबरच खूप काही शिकवतील. यासारख्याच शास्त्रज्ञांच्या काही रंजक माहितीची एक पर्वणीच प्रस्तुत पुस्तकातून मिळते.