जगातल्या नावाजलेल्या कंपन्यांची सुरुवात कशी दुर्दम्य इच्छा व दृढ विश्वासाच्या बळावर केली, हे या पुस्तकातून अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने लेखनबद्ध केले आहे. या कंपन्या आज अनन्यसाधारण म्हणून गणल्या जातात पण प्रत्येक कंपनीला प्रारंभीकाळी खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले हेही तेवढेच सत्य. व्यवस्थपनशास्त्राचे विद्यार्थी, उद्योजक आणि प्रगतीबाबत जागरूक असणार्या प्रत्येकास या यशकथा निश्चितच प्र्रेरणादायी आहेत.