खाजगीत मनाला न पटणार्या चुकीच्या निर्णयाला एकदा समूहाचा भाग झालो की आपण दुजोरा का देतो? एखाद्याच्या केवळ बाह्यदर्शनावर जाऊ नये असे शिकवण्यात आले असूनही आम्ही देखण्या लोकांमुळे का प्रभावित होतो? आपण जसे आहोत तसे का आहोत याचा शोध घेताना तज्ज्ञ ज्या साध्या प्रयोगांचा वापर करतात, ते समजून घेणे रंजक आहेच, पण आपल्याच उगमापाशी जाण्याची तज्ज्ञांची ही धडपड प्रत्येकाने समजून घ्यावी इतकी वेधकही आहे! जगाचा इतिहास बदलून टाकणार्या अशा दहा सिध्दांतांच्या या अतिशय रंजक कथा.