एका संपादकाच्या धडपडीची, त्याच्या प्रतिज्ञेची, त्याच्या बांधीलकीची आणि त्याच्या माघारीची आहे. गांधीवादी राजकारणात ज्यांचा मन:पिंड तयार झाला, त्यांना मंदपणे जाणवणारी सार्वजनिक जीवनातील मूल्यहीनता, भारताातील स्वातंत्र्योत्तर राजकीय संस्कृतीनं निर्माण केलेला राजकारण्यांचा बेछूट आणि विधिनिषेधशून्य आचार, वाढत्या उद्योगसमूहाचे म्हणून जे व्यावसायिक हितसंबंध असतात त्यांंचं महत्त्वाकांक्षी उद्योगपतींना जाणवणारं प्राधान्य आणि व्यक्तिगत मूल्याभानाला असलेल्या मर्यादा...