भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पारंपरिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवनमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले. या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे.इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतिकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.