Skip to product information
1 of 1

Internet Vaparatil Dhoke Talnyasathi By Atul Kahate

Description

सध्याच्या ऑनलाइन युगात इंटरनेट हे माध्यम जगण्याचा एक अत्यावश्यक भाग बनलं आहे. संगणक, स्मार्टफोन यांच्यामार्फत हे बहुउपयोगी माध्यम वापरून सहकार्‍यांशी, नातेवाइकांशी तसेच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो, ऑनलाइन खरेदी करता येते; इतकंच नाही तर इंटरनेट बँकिंग, क्रेडिटडेबिट कार्ड यांचा वापर करून घरबसल्या आपले आर्थिक व्यवहारही एका ‘क्लिक’सरशी करता येतात.पण या माध्यमाचा वापर करताना अनेक धोकेही संभवतात. ते धोके कोणते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याची माहिती फारच थोडया जणांना असते. या पुस्तकात ही उपयुक्त माहिती सहजसोप्या भाषेत उदाहरणांसह सचित्र देण्यात आली आहे : * इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा? * सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा? * जंकस्पॅमफिशिंग म्हणजे काय? * व्हायरससारख्या घातक सॉफ्टवेअर्सचे प्रकार * इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड यांचा सुरक्षित वापर कसा करावा? * फेसबुकसारख्या सोशल नेटवगि साइट्सवर वावरताना कोणती काळजी घ्यावी? * ऑनलाइन फसवणूक किंवा खंडणी म्हणजे काय? * स्मार्टफोनचा सुरक्षित वापर कसा करावा? * ईमेल अकौंट, बँक खातं वा क्रेडिट कार्ड यांबाबतीत समस्या निर्माण झाल्यास काय करावं? सर्व वयोगटातील व्यक्ती, कर्मचारी-व्यावसायिक-उद्योजक आणि बँका, शासकीय व शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरावं…इंटरनेटचा वापर सुरक्षित व ‘स्मार्टपणे’ कसा करावा, याबाबत ‘साक्षर’ करणारं पुस्तक!
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Internet Vaparatil Dhoke Talnyasathi by Atul Kahate
Internet Vaparatil Dhoke Talnyasathi By Atul Kahate

Recently viewed product

You may also like