Skip to product information
1 of 1

Indira By Catherine Frank

Description

३१ ऑक्टोबर, १९८४....सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहऱ्या वर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत. इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना `क्रांतीचे अपत्य` म्हणून संबोधले. -शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामथ्र्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्माधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे सांभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला `वूमन ऑफ द मिलेनियम` म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे. The early morning hours of 31st October 1984; she was strolling through her gardens with a smile on her face. Her both hands joined in a `namaste. Indira Gandhi was assassinated by her own body guards. Her death was similar to her life. Though surrounded by thousands of people she was always alone. A great epic, a great life came to an abrupt end, in a wrong way, by the wrong deeds. She was born in the era when Indian nationalism was born. Her father Pandit Jawaharlal Nehru always referred to her as the baby of revolution. She was strong physically as well as mentally. It was the wish of destiny that Indira would play a vital role in the post independent Indian politics. In the beginning she flinched a bit. She was initially very shy, introvert and fragile. But as she accepted the responsibility she did neither turn back nor flinch. She was one of the topmost, powerful, influential, international political figure. She was the Prime Minister of the largest democratic country of the world, but it was a fact that this country was shattered due to the various religions. It was extremely difficult to understand the mentality of the people here. It was mainly a male chauvinistic society. Katharine Frank has tried to take a review of the `Woman of the Millennium`, the lady who was the leader of the biggest democratic country and who carried it out very competently; and whose name was imprinted on the 20th century through the work she did.
Regular price
Rs. 440.00
Regular price
Sale price
Rs. 440.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Indira By Catherine Frank
Indira By Catherine Frank

Recently viewed product

You may also like