आयडॉल्सएक थोर क्रिकेटर जेव्हा थोर क्रिकेटरांबद्दल लिहितो तेव्हा "आयडॉल्स' नावाचं पुस्तक तयार होतं.सुनील गावसकर हा स्वतः एक थोर क्रिकेटर. पण स्वतःचा थोरपणा विसरून तो या पुस्तकात दुसऱ्या थोर क्रिकेटरांचं गुणगान करतो.विश्वनाथच्या कलात्मक खेळाचं तो कौतुक करतो, बॉयकॉटच्या तंत्रावर बेहद खुष होतो, ग्लेन टर्नरच्या धावांच्या हव्यासानं स्तिमित होतो, ग्रेग चॅपेलच्याझुंजार वृत्तीची तारीफ करतो, रोहन कन्हाईपासून काय शिकण्यासारखं आहे ते मुक्त मनानं सांगतो, विविअन रिचर्डस्पेक्षा आज दुसरा कोण चांगला आहे असा प्रश्न विचारतो, ईयान बोथमला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणतो, डेनिस लिलीच्या तुफानी चेंडूफेकीचा आदराने उल्लेख करतो, इमानखानच्या गोलंदाजीच्या वैशिष्ट्यं सांगतो, आणि बेदी, प्रसन्ना, वेंकी व चंद्रा यांच्या जादुगिरीचे वर्णन करतो. एवढेच काय पण एकही टेस्ट न खेळलेल्या पॅडी शिवलकरची व राजिंदर गोएलची पाठ थोपटतो..... आयडॉल्सच्या थोरवीचं आणखी वर्णन ते काय करावं?