‘हितोपदेश’ या नीतिकथांच्या संग्रहाचा कर्ता नारायण अकराव्या-बाराव्या शतकात होऊन गेला. ‘पंचतंत्र’ या प्रसिद्ध कथासंग्रहातील मूळ कथांवर त्याने या कथा बेतलेल्या आहेत. हा कथासंग्रह ‘हितोपदेश’च्या आधी जवळजवळ एक हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला होता. ‘हितोपदेशा’तील सर्व कथा चार स्वतंत्र अध्यायांत विभागलेल्या आहेत : मित्रलाभ, सुहृद्भेद, विग्रह आणि संधी. या छोट्या पुस्तिकेत संग्रहीत केलेल्या ‘हितोपदेशा’तील कथा आमच्या छोट्या-छोट्या वाचकांचे मनोरंजन तर करतीलच; शिवाय भारताच्या गौरवशाली भूतकाळाचेही दर्शन त्यांना घडवतील.