या आक्रमक नेतृत्वाने अवघ्या सहा वर्षांत जखमी जर्मन गरुडाच्या रक्तबंबाळ पंखांत पुन्हा आभाळझेप घेण्याइतके सामर्थ्य ओतले. बृहद्जर्मनीचे संस्थापन आणि ज्यू धर्मीयांचे निर्दालन हे या नेतृत्वाने निर्माण केलेले दाहक रसायन. चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन या तीन मातबर प्रतिस्पर्ध्यांशी त्याने झुंज घेतली. सारे जग विरुध्द एकटा हिटलर असा हा सामना होता. १९३३ ते ४३ ही दहा वर्षे हिटलरची होती - एकट्या हिटलरची. युरोपमधल्या महासत्तादेखील त्याच्या भेदक नजरेच्या धाकात वावरत होत्या. त्यातूनच त्याला आदर आणि विस्मय, भय आणि संताप या परस्परभिन्न पण प्रखर प्रतिक्रियांचा स्वीकार करावा लागला. सिकंदर आणि नेपोलियन या समशेरबहाद्दर सम्राटांचा पराक्रम हिटलरने फिका ठरवला. विसाव्या शतकाने अनुभवलेल्या या विनाशक वादळाची ही चरितकहाणी.