२६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी विष्णुदास भावे यांनी ‘राजा गोपीचंद’ हे नाटक हिंदीतून सादर केले. हिंदी आणि भारतीय रंगभूमीच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे. तत्कालीन वृत्तपत्रे, बातम्या व इतर माहितीच्या आधारे डॉ. चंदूलाल दुबे यांनी ह्या घटनेचा व भावेंच्या पूर्ण जीवनाचा शोध घेतला आहे. त्यातून भावेंचे चरित्र व प्रातिभ व्यक्तिमत्व वाचकांना समजून घेता येते. भावेंचा हा नाट्यप्रवास तितका सोपा नव्हता. भावेंच्या
भ्रमंतीचा व अडचणींचाही उल्लेख ह्या पुस्तकात आहे. भावे यांनी केलेले बाहुल्यांचे खेळ व त्यासंबंधी रामदास पाध्ये यांचे विचार अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत. एकूणच भावे हे केवळ मराठीच नाही तर हिंदी रंगभूमीचे आद्य जनक आहेत, हे ह्या पुस्तकातून स्पष्ट होते. भारतीय रंगभूमीच्या नाट्य अभ्यासात मौलिक भर घालणारे हे पुस्तक सर्वार्थाने महत्त्वाचे आहे.