Skip to product information
1 of 2

Himalay Darshan (हिमालय दर्शन) by Dr Swati Karve

Description

अनेकांना असते त्याप्रमाणे मलाही हिमालयाचे आकर्षण होतेच. बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी काश्मीर, बद्रीनाथ, केदारनाथ, कुलू, मनालीचा प्रवास केला होता. त्यांनी काढलेली लॅण्डस्केप, छायाचित्रे यांची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. त्यांच्याकडून हिमालयाची वर्णने, प्रवासातील गमतीजमती ऐकल्या होत्या. तेव्हा रेल्वे पठाणकोट पर्यंतच जात होती. तेथून पुढे त्यांनी बसने प्रवास केला होता. तेव्हापासून मनात हिमालयात जाण्याची इच्छा होती. परंतु इच्छा प्रत्यक्षात उतरण्यासाठी काही वर्षे वाटही बघावी लागली. १९८६ च्या मे महिन्यात आम्ही प्रथम दोन्ही मुलांना घेऊन काश्मीर, अमृतसर, दिल्ली, आग्रा ही सहल गुरुनाथ ट्रॅव्हल कंपनीतून केली. काश्मीरचा प्रवास ही हिमालयाची एक झलक होती. परंतु जम्मू-श्रीनगर प्रवास, काश्मीरमधील बागा, दालसरोवर, पहेलगाम, गुलमर्ग, तिथला रोप-वे, झेलम नदीचा उगम वेरीनाग हे बघून जीव वेडावून गेला. आमचा सहल मॅनेजर होता श्री. अशोक जोशी तरुण, उत्साही, बोलका व कामसू पंजाबी तरुण. अशोक आपल्या प्रवासाचे अनेक किस्से रंगवून सांगत असे. ‘‘बद्रीनाथ-केदारनाथ लवकर करा. तो प्रवास तरुण वयात करा तरच त्याचा आनंद घेता येईल, असे तो वारंवार सांगत असे!’’ झालं. आम्हांला एवढी प्रेरणा पुरेशी होती. प्रवासाची आवड आम्हां दोघांनाही सारखीच. त्यामुळे सुहासनी कधी नाही म्हटले नाही. काश्मीरच्या पाठोपाठ आम्ही बद्रीनाथ-केदारनाथ, गंगोत्री-यमुनोत्री ही उत्तराखंड चारधाम यात्रा आणि वैष्णवदेवी-अमरनाथचा प्रवास केला. बद्रीनाथचा प्रवास करताना मी डायरी लिहीत होते. प्रवासवर्णन लिहिण्याचे मनात नव्हते. परंतु हिमालयातील प्रवास हा विलक्षण, वेगळा अनुभव असणार आहे. आपले अनुभव, मनातील विचार लिहायचे असे ठरवले होते. हनुमानचट्टी ते जानकीचट्टी हा पायी प्रवासाचा पहिला अनुभव घेतला. प्रथम टेन्शनने भीती वाटली. पायाच्या दीर्घ दुखण्यातून नुकतेच बरे वाटत होते. त्यामुळे थोडे दडपण होते. परंतु लवकरच मी सावरले होते. त्या दिवशी संध्याकाळी मी लिहिण्यास सुरुवात केली आणि लिहीतच गेले. प्रवासात एकीकडे माझे लेखन चालू होतेच. त्यावर आधारित लेख साप्ताहिक सकाळ व केसरीमध्ये प्रसिद्ध झाले. १९८९ मध्ये आम्ही अमरनाथची यात्रा केली. काश्मीर तीन वर्षांत खूपच बदलून गेले होते. वातावरणात तणाव स्पष्टपणे जाणवत होता. आम्ही ऑगस्टमध्ये काश्मीरमध्ये होतो आणि पाठोपाठ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काश्मीरमध्ये लष्करी कारवाई झाली. अतिरेकी कारवायांनी काश्मीर खोरे हादरून टाकले. नंतरच्या वर्षी अमरनाथ यात्रा झालीच नाही. तेव्हा ‘एकाकी अमरनाथ’ हा लेख मी केसरीत लिहिला होता. खूप पाणी अनेक वर्षांच्या पुलाखालून वाहून गेले. परत हिमालयात जाणे झाले नाही. इतर प्रवास खूप केला, पण हिमालयात जाण्याचा योग आला नाही. कुलू-मनाली अजून व्हायचे आहेच. पण हिमालय प्रवासाची मजा, अनुभव वेगळाच. तो अनुभव अन्य प्रवासात येत नाही. इतकी वर्षे झाली तरी मनात आठवणी होत्याच. माझ्या लेखनाची डायरी मात्र अनेकजण नेऊन आवडीने वाचीत होते. उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सुधाकर जोशी यांच्याबरोबर बोलताना या लेखनाचा विषय निघाला. त्यांनी लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शवली. माझ्या मनात विचार आला. बद्रीनाथ-केदारनाथच्या लेखनाला अमरनाथ, वैष्णोदेवी विषयीच्या लेखनाची जोड द्यावी. अमरनाथविषयी लिहिलेल्या लेखाची कात्रणे सापडली. परंतु वैष्णवदेवीविषयी लेखन त्यामध्ये नव्हते. सर्वच पुनर्लेखन करायचे ठरले. मन उडत उडत पुन्हा मागे गेले. १९८९ ऑगस्टवर जाऊन पोचले. जुनी फाईल उघडली गेली आणि मनात साठवलेले दालनच जणू उघडले गेले. मन इतकी वर्षे मागे गेले. सारा प्रवास तपशिलासह मनात जागा झाला. काही आठवण्याची खटपट करावी लागली नाही. जणू नुकताच प्रवास केला असावा इतक्या आठवणी ताज्या वाटत होत्या. त्यामुळे लेखन करताना मी त्यात हरवून गेले. पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला. सर्वच लेखन ‘हिमालय दर्शन’ या पुस्तकात आता प्रसिद्ध होत आहे. इतक्या वर्षांनी लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे, याचा खरोखर आनंद आहे. पुस्तकाची कल्पनाच मनात नव्हती. त्याचे श्रेय सर्वस्वी श्री. सुधाकर जोशी यांनाच आहे. वाचकांना लेखन आवडेल असे वाटते. रंगीत छायाचित्रांची जोड पुस्तकाच्या सौंदर्यात निश्चितच भर घालते. प्रस्तुत पुस्तकातील रंगीत छायाचित्रे आमचे मित्र श्री. कुमार दिघे ह्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांचे मनापासून आभार.- डॉ. स्वाती कर्वे
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
-0%
Himalay Darshan हिमालय दर्शन by Dr Swati Karve
Himalay Darshan (हिमालय दर्शन) by Dr Swati Karve

Rs. 100.00

Recently viewed product

You may also like