'चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन अमेरिकेतल्या गगनमहालाला गवसणी घालणा-या मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन. वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास, कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ विश्र्वास, स्वत:शीच चाललेला निरंतर संघर्ष, अविरत विश्र्वभ्रमण, उत्कट कलासक्ति, उदंड कर्तृत्व, दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील. नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय सुधीर जांभेकर. मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरूणाईला प्रेरक ठरावी अशी एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी. वैयक्तिकतेकडून वैश्र्विकतेचा रोमहर्षक प्रवास... '