‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका ! तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक -सगळयावर समाजाची बारीक नजर ! जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती समाजाला कशी कळणार ? बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे, ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ? विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.