Skip to product information
-
Media gallery Media gallery
Harali By Bhoyar Anant
Description
Description
"ग्रामीण कथालेखक म्हणून विशेष प्रसिद्ध असणारे अनंत भोयर यांचा ‘हराळी’ हा सतरा कथांचा संग्रह. यातील कथा मुख्यतः कास्तकारी (शेती) विषयाशी संबंधित आहेत. शेती करताना येणाNया नानाविध अडचणींना तोंड देताना शेतकNयाला कोणकोणती कसरत करावी लागते याचे वर्णन अनेक कथांमध्ये आले आहे. मुळात शेती ही पावसावर (बेभरवशी) अवलंबून असते. तसेच कधीकधी अशी टोकाची वेळ येते की, ही शेतजमीन विवूÂन अन्य व्यवसाय करावा विंÂवा पिकाची चांगल्या प्रकारे निगराणी करूनसुद्धा मालाची विक्री न झाल्यामुळे, अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने तर कित्येकदा उत्पादन खर्चाइतकेही पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रासून जातो; अगतिक होतो. उदाहरणार्थ वावरातल्या (शेतातल्या) कामाला कोणीही मजूर मिळेना म्हणून भंगार मालाच्या धंद्यातून शेतजमीन खरेदी करणाNया भंगारवाल्यालाच ‘माझी जमीन विकत घेतो का? असे विचारण्याची वेळ प्रतिाQष्ठत कास्तकारावर कशी येते त्याचे वर्णन ‘टिनटप्पर’ कथेत आहे. तर प्रमुख शेतमजुरांतील आपापसांतील (विशेषतः स्त्री-पुरुष शेतमजूर) स्पर्धा, वर्चस्वासाठी वादावादी विंÂवा भांडणाचा मूळ मालक असणाNया कास्तकाराला कसा फायदा विंÂवा तोटा होतो याचे वर्णन ‘तितंबा’ कथेमध्ये आहे. शहरी भागातल्या लोकांना हराळी हे हिरवे गवत मऊ-मुलायम गादीसारखे म्हणून आकर्षक व सुखदायक वाटते; तर तेच हिरवे गवत भरपिकात वारंवार तणासारखे पसरत/माजत असल्याने शेतकNयाला किती त्रासदायक ठरते याचे वर्णन ‘हराळी’ या कथेत आले आहे. या कथासंग्रहात आजूबाजूच्या समाजात आढळणारी विविध माणसे, त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या मनांतील दुःखे जाणून घेणाNया ग्रामीण ढंगाच्याही अनेक कथा आहेत. उदाहरणार्थ इतर सर्व बोलत असताना महत्त्वाची गंभीर गोष्ट सांगायला खूप वेळ संधीच न मिळाल्याने एका खेडूताची झालेली कोंडी ‘काटा’ कथेत आहे. तर पत्नीच्या माहेरचा ओळखीचा माणूस तिला भेटायला येऊन तिच्याशी गप्पा मारत राहातो. झोपेचं सोंग घेऊन नवरा ते ऐकत असतो; त्यामुळे त्याच्या मनात नको ते विचार येऊन त्याला पाहुण्याचा मत्सर वाटू लागतो, असा आशय ‘पांघरून’ या कथेमध्ये आला आहे. उत्सुकतापूर्ण सुरुवात, आकर्षक मध्य, शेवटी निरगाठ आणि तिची उकल विंÂवा शक्य झाले तर कलाटणी या तंत्रात कथा बसवण्याचा अनेक लेखकांचा प्रयत्न असतो आणि असं तंत्र जो अवलंबतो, त्यांच्या कथांत तंत्र राहतं; मंत्र जातो. मात्र, ‘हराळी’ या कथासंग्रहात अनंत भोयर यांनी आपल्याला भावलेले जीवनातील कलात्मक अनुभव शक्यतो, जसेच्या तसे व्यक्त केले आहेत, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. जीवनातल्या भडक प्रसंगांपेक्षा माणसांच्या मनांतील दुःखांचा वेध घेणं आणि अशा मनाचे पापुद्रे उलगडणं हा भोयर यांच्या लेखणीचा एक विशेष आहे. आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून त्यांना शब्दरूप देणं ही तशी कष्टसाध्य गोष्ट आहे. भोयर यांना ती साध्य झाली आहे. "
- Regular price
- Rs. 240.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 240.00
- Unit price
- / per
-0%
Notified by email when this product becomes available
Harali By Bhoyar Anant