गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन ह्या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. शृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा आद्य मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय. कै. स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना, संपादन, भाषांतर व टीका हे ह्या ग्रंथाचे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे. जोगळेकरांचे हे कार्य अनन्यसाधारण आहे. गाथासप्तशतीच्या काळात महाराष्ट्रात संस्कृत, प्राकृत व पैशाची ह्या भाषा होत्या हे ह्या ग्रंथामुळे स्पष्ट होते