सहलेखक - अतुल कहाते'गुलाम' हा शब्द अलीकडे आपण फक्त पत्ते खेळताना वापरतो; पण कित्येक शतकं या शब्दानं मानवतेची निव्वळ थट्टा केल्याचा जागतिक इतिहास जाणून घेतला की या शब्दामधली दाहकता आपल्याला समजेल ... पुस्तकाचा नेमका बोध करून देणारं उपशीर्षक आहे 'स्पार्टाकस ते ओबामा' असं. रोममधल्या गुलामगिरीच्या कहाण्यांपासून हा प्रवास सुरू होतो. स्पार्टाकस आणि ग्लॅडिएटर्सच्या उठावाबराबरच तो आपल्याला गुलामगिरी ही विविध धर्मांमध्ये कशी फोफावली आहे, ते तो दाखवत जातो. पुढे अमेरिकेतील गुलामगिरी आणि त्याविरोधात झालेले लढे यांचं दर्शन घडवत लेखक आपल्यापुढे थेट बराक ओबामानं घडवलेल्या इतिहा