या ग्रंथात म. वा. धोंड, श्री. मा. कुलकर्णी, स. रा. गाडगीळ, ह. श्री. शेणोलीकर, वा. के. लेले, रा. ग. जाधव, गं. ना. मोरजे, अ. वा. कुलकर्णी इत्यादी मान्यवर समीक्षक आणि वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, हरिभाऊ मोटे, पु. भा. भावे इत्यादी ख्यातनाम ललित लेखक यांच्या व अन्य काही समीक्षक व लेखक यांच्या पुस्तकांची द. दि. पुंडे यांनी घेतलेली शब्दरूप ‘दर्शने’ समाविष्ट आहेत. ही सगळी दर्शने भाविकपणे न घेता चिकित्सकपणे आणि त्याचवेळी सहृदयपणेही
घेतलेली आहेत. त्यामुळे ‘ग्रंथदर्शन’ हे पुस्तक म्हणजे मराठी समीक्षेच्या वाचकांना आणि मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना वेगळीच अक्षरभेट ठरणारे आहे.