भारतीय संस्कृतीचे मूळ क्षेत्र ग्रामजीवन हे आहे. भारतीय खेडी ही शहरांच्याही अगोदरची असून वेदकाळापासून आQस्तत्वात आहेत. हजारो वर्षे आQस्तत्वात असलेल्या या खेड्यांतून आजही लोकसंस्कृतीचे झरे वाहताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामजीवनाला सरकारी पातळीवर कागदोपत्री तरी चांगले दिवस आले. लोकशाही आली आणि खेडी जागी होऊ लागली. या जागृतीची एक खूण म्हणजे एकोणीसशे साठनंतरचे ग्रामीण साहित्य होय. आज ते नव्या उन्मेषाने अवतरू पाहते आहे. या नव्या वाटचालीत ग्रामीण साहित्याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात, उपाQस्थत केले जातात. संक्रमण अवस्थेच्या या काळात अनेक वाङ्मयबाह्य हेतूंनी ग्रामीण साहित्याविषयी गैरसमजही पसरविले जातात. ग्रामीण साहित्य आणि सामाजिक वास्तव यांचा एक अतूट संबंध आरंभापासून आहे. ग्रामीण साहित्यविषयक या विविध प्रश्नांची उत्तरे काय असू शकतील - वाङ्मयीन समस्यांचे तात्त्विक स्वरूप काय असू शकेल - ग्रामीण साहित्य आणि खेडे यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे - शहर आणि ग्रामीण साहित्य यांचे नाते काय - इत्यादी विविध प्रश्नांची, समस्यांची, संबंधांची, कसांची वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या तात्त्वक मूलगामी चर्चा करणारा हा ग्रंथ आहे.