अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचागेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतीलनि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते.धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचाबुळबुळीत स्पर्श आहे.प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे.सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणाराकथाविष्कार हाताळणार्या धारपांची शब्दकळातरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे.हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचेगमक मानायला हरकत नाही.कमीत कमी संवादांच्या वापरातूननिव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारेवाचकाचे काळीज गोठवणार्या,भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणार्याधारपांच्या अ-गोचर कथांनीमराठी वाचकाच्या मनातभयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थानधारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.