या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणार्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसंसुद्धा वाचल्याशिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा-विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोक्याच्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंगचित्रेही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा ह्या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात—आणि वाट्टेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात; पुन्हा वाचून पाहाव्याशा वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार्या गोष्टी नाही का?