‘आई’ होणं सोपं असतं; पण ‘आईपण’ येणं अवघड असतं. बाळाची गर्भातली वाढ, त्याचा जन्म आणि जन्मानंतरचा विकास या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. हे वरदान त्रासदायक ठरू नये म्हणून गर्भवतीची योग्य ती काळजी घ्यावी लागते.गर्भावस्थेत गर्भाला अन्नपुरवठा होतो तो मातेकडून म्हणून प्रत्येक महिन्यानुसार होणारी बाळाची वाढ व त्या वाढीला नेमक्या कोणत्या अन्नपदार्थाची गरज असते, कोणता आहार बाळाला सुदृढ, अव्यंग होण्यास उपयुक्त असतो, मेंदूच्या पेशींची वाढ, हृदयाचे स्नायू, हाडे, मज्जारज्जू, आतडी, फुप्फुसे या सर्वांच्या अत्युत्तम वाढीसाठी कोणत्या पौष्टिक आहाराचा पुरवठा हवा, तसेच पूर्वशालेय व शालेय मुलांना कोणता व कसा आहार दिला जावा याबद्दल प्रस्तुत पुस्तकात तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे.आपण आपल्या मुलांवर जन्मापासून अनेक संस्कार करतो. त्यांच्यावर अन्नसेवनाचे संस्कारही करायचे आहेत. त्यांचे पोषण ही आपली जबाबदारी आहे. केवळ यासाठी वाचकांना बाळ, आहार आणि पोषण साक्षर करण्याचा प्रामाणिक हेतू असणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.