गणपती बाप्पाचं नाव घेतलं, की डोळ्यांपुढे बाप्पाचं गोजिरवाणं रूप उभं राहतं. भारतात सर्वत्र गणपती विघ्नहर्ता म्हणून पूजनीय आहे. म्हणूनच प्रत्येक शुभकार्यारंभी समस्यांचं निवारण करणाऱ्या लाडक्या बाप्पाला वंदन केलं जातं. मनोभावे त्याची पूजा केली जाते. गणपतीच्या जन्माची कथाही रंजक आहे. बाप्पाच्या जन्मानंतर लगेचच त्याचं आणि भगवान शंकराचं युद्ध झालं होतं, त्यात कोण विजयी ठरलं? काय घडलं? हे सांगणारी लाडक्या बाप्पाच्या जन्माची ही चित्ररुपी कथा!