'काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर. मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष. स्वातंत्र्यलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्ज्वल अन् उदासही... गांधींनी एका भाग्यात देश जोडला! मनं साधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत... ते स्वातंत्र्यसंग्रामाचे सरसेनापती. तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा. धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्यासमोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं. महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी...या आणि अशाच काही जिवलग सहका-यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो... जणू गंगेत वितळत जाणारं आकाश