ही कथा केवळ एका नदीची नव्हे तर दैवी लोकातून पृथ्वीवर आलेल्या त्या स्त्रीची..गंगेची आहे. गंगेच्या प्रवाहात वाहणारे केवळ सात जीव नव्हते त्यांच्या सोबत वाहत होती देवसभा,शाप, मुक्ती, प्रेम,वचन आणि नियतीची एक अद्भुत कथा. एका मातेची शांतनूच्या प्रेमाची देवव्रताच्या जन्माची आणि अशा नियतीची, जिच्या लाटा आजही इतिहासाच्या किना-यावर आदळत राहतात.