शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता, आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने, अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या आपल्याला घेरून उभ्या आहेत. सेक्युलर की कम्युनल? एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी? समता की सर्वोदय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. राजीव साने मांडत आहेत या शोधाला एक नवे वळण देणारी समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी समंजस उजवेपणाची भूमिका. या भूमिकेतून प्रचलित दुराग्रह व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे गल्लत गफलत गहजब