हर्क्युल पायरो कड्याच्या टोकावर उभा होता. इथेच काही वर्षांपूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला होता. पाठोपाठ दोन मृतदेहही सापडले होते... एका जोडप्याचे. दोघांचीही हत्या बंदुकीनेच झालेली होती.
पण नेमकं कुणी कुणाला मारलं होतं? संगनमतानं केलेली ती आत्महत्या तर नव्हती? की वासनेनं प्रवृत्त केलेला खून? की थंड डोक्याने केलेली हत्या? पायरो भूतकाळ खणत जातो आणि त्याला शोध लागतो- ‘जुन्या पापांच्या सावल्या खूप लांब असतात.’
‘अतिसुंदर... आपल्याला जे माहीत करून घ्यायचं आहे तेच ती सांगते. त्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही.’
- द टाइम्स