नारायण धारप यांच्या भयकथांमध्ये वाचकांना त्यांचा अविश्वास क्षणभर दूर ठेवायला लावण्याची किमया आहे. अनंताच्या यात्रेवर निघालेले अवकाशयात्री, केवळ नजरेने अवकाशाला गवसणी घालणारा अतिमानव, नव्या अतीद्रिय शक्तीने गोंधळलेली स्त्री, विश्वाचीच राखरांगोळी करणारा मनस्वी संशोधक अशा अनेक वैचित्र्यपूर्ण व्यक्तींची ओळख आपल्याला या कथांमधून होते. धारपांची भाषा चित्रमय आहे. वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना प्रत्यक्ष उभी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आणि लेखनशैलीत आहे.असीमित अवकाश प अनंत काळ यांचा समावेश असलेल्या या कथा तर्काच्या मर्यादा मात्र कधीही ओलांडत नाहीत.अकल्पनीय वाटणाऱ्या घटनासुद्धा शास्त्राच्या सर्वमान्य मर्यादित बसण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.