Skip to product information
1 of 2

Dwarkadhish (द्वारकाधीश) by Samar (समर)

Publication: Samar Publication

Description

सहा राज्यांचा वादळी संघर्षद्वारकाधीश भाग एक श्रीकृष्णाच्या चरित्रातील त्याच्या वृंदावनातील लीला व कुरुंच्या गृहयुद्धातील त्याची भूमिका सर्वाधिक प्रसिद्ध असली, तरी त्याचं कर्तृत्व अधिक उजळलं ते त्या दोन बिंदूंमधील त्याच्या कार्यकाळात. त्या काळात श्रीकृष्णाला गोपाळ होऊन निवांतपणे बासरी वाजवण्याची किंवा तत्त्ववेत्ता होऊन नानाविध सिद्धान्त, मांडण्याची सवड नव्हती. त्याला जरासंधासारख्या प्रबळ शत्रूपासून मथुरेचं रक्षण करायचं होतं, द्वारकेची निर्मिती करून नवं राज्य उभारायचं होतं आणि यादवांचं वर्चस्वही पुनर्प्रस्थापित करायचं होतं. या भागात कंसवध ते जरासंधाशी झालेलं अंतिम युद्ध हा कालखंड वाचकांसमोर मांडला आहे. कादंबरीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीचा नायक श्रीकृष्णच असला, तरी त्याच्याशी लढणारे, संबंधित असणारे किंवा तत्कालीन भारताच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचे असे अन्य पाच राजेही कादंबरीतील मुख्य पात्रे आहेत. त्यामुळेच कादंबरीचं उपशीर्षक 'सहा राज्यांचा वादळी संघर्ष' असं आहे. कुरुक्षेत्री झालेल्या युद्धात हे राजे एकमेकांसमोर आले, त्यामागे काही ना काही कारण होतं. केवळ कौरव किंवा पांडवांची बाजू योग्य वाटली म्हणून ते त्यांच्या बाजूने उभे राहिले असं नसून प्रत्येक राजाचा दुसऱ्या पक्षातील एखाद्या राजाशी असलेला सुप्त संघर्ष त्या सर्वांना लढण्यास प्रवृत्त करत होता. 'द्वारकाधीश' कादंबरीमालेच्या या पहिल्या भागात तुम्हाला उग्रसेन, जरासंध, द्रुपद, साल्वेय, धृतराष्ट्र आणि कुलशेखर पांड्य या सहा प्रमुख राजांच्या संघर्षाची बीजंही जाणून घेता येतील. थोडक्यात, त्या राजांच्या राजकीय संघर्षाची ही एक चित्तथरारक कहाणी आहे! लेखक : समर 
Regular price
Rs. 430.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 430.00
--72%
Dwarkadhish (द्वारकाधीश) by Samar (समर)
Dwarkadhish (द्वारकाधीश) by Samar (समर)

Rs. 430.00

Recently viewed product

You may also like