Skip to product information
1 of 1

Drushtant by Dnyaneshwar Lendhve

Description

प्रसिद्धीच्या परिघाबाहेर राहून कवितेवर मनापासून प्रेम करणार्‍या ज्ञानेश्वर लेंडवे यांचा हा कवितासंग्रह अतिशय तरल आणि भावगर्भी आहे. वरकरणी सरळ, साधी, सोपी वाटणारी कविता मात्र खोल अर्थपूर्ण आहे. ‘डोहाकाठी’, ‘पाऊस’ अशा कवितांमधून हळुवारपणे झिरपत जाणारे त्यांचे संवेदनशील मन ‘सावल्या’, ‘सांज’, ‘मी’मधल्या कवितांमधून गूढवादाकडे प्रवास करते. कवी स्वतःच ‘पांथस्थ’ होतो. त्याचे हे होणे त्याच्या नकळत झाले आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यांतील गूढता अधिक गर्द करणारी ही कविता केवळ दुःख किंवा वेदनांना स्पर्श करत नाही, तर भोवतालचा संपूर्ण अवकाश व्याप्त करण्याचा ती प्रयत्न करते. ‘दृष्टांत’मधील कविता म्हणजे कवीचा कवीशी असलेला संवाद नाही,तर हे कवच फोडून ती रसिकांशी संवाद करू लागते. लेंडवे यांच्या कवितेचे हेच वेगळेपण आहे.
Regular price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 81.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Drushtant by Dnyaneshwar Lendhve
Drushtant by Dnyaneshwar Lendhve

Recently viewed product

You may also like