डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे ऋषितुल्य राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ज्ञ, संस्कृतीचे अभ्यासक आणि एक महान शिक्षक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत.बारा वर्षे स्वतंत्र भारताची अमोल सेवा त्यांच्या हातून घडली. त्यांच्यासारखी ज्ञानी, मुत्सद्दी आणि प्रेमळ व्यक्ती आज राष्ट्रध्यक्ष म्हणून आपणास लाभली, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा गौरव करताना म्हटलं होतं.वादळात सापडलेल्या जहाजाला दीपस्तंभ जशी दिशा दाखवितो, तसे त्यांचे विचार आजही प्रेरणा देत आहेत.