सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे । १ ।
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवां सम्मानितो २ ।
जाणतो अंति अम्हांला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे ३ ।
मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतकेच की, तो आमुचा कोणी नव्हे ४ ।
आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे । ५ ।