Skip to product information
1 of 2

Dongari Awale An Vilayati Chincha (डोंगरी आवळे अन विलायती चिंचा ) by Madhuri Bapat

Description

अमेरिकेत पंचवीस, तीस, पस्तीस, चाळीस वर्षे राहिल्यावर आपण तळ्यात नसतो व मळ्यातही नसतो, तर ते दोन्ही जोडणाऱ्या पाटबंधाऱ्यांत असतो. दोन्हीकडच्या चांगल्या वाईटांची देवाणघेवाण करणारे आपण फक्त माध्यम असतो. ओहायोत असताना माझी एक चिनी मैत्रिण म्हणाली होती, "एकदा तुम्ही तुमची जन्मभूमी सोडली की तुम्ही कुठल्याच देशाचे नागरीक राहात नाही, तर विश्वाचे रहिवासी होऊन जाता."शेवटी एकदाची चौथ्या सेमेस्टरमध्ये बऱ्याच प्रयत्नानंतर मला चाकावरची भांडी करणं जमू लागलं. त्याची मेख म्हणजे, There is no trick! क्लासच्या भिंतीवर एक वाक्य लिहिले आहे 'Many people spend life learning the tricks of the trade and never learn the trade'. भरपूर चिकाटी, एकाग्रता, व Go with the flow अशी मनाची धारणा असणं महत्वाचं. त्या मातीशी भांडण केल्यासारखं तिला हाताळायच नाही. आपणच तिच्याबरोबर मातीमय व्हायचं. थोडक्यात त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं. हीच ट्रिक. आता कळून चुकलं होतं, त्या • गोऱ्या कुंभाराला कसा देव सापडला असावा ते.पण क्वचित् केव्हांतरी त्यांचा आपणहून फोन येतो व त्या मराठीत म्हणतात, 'इथं सगळे गुजुभाई आहेत. त्यांना गुजराथी बोलतांना ऐकलं की मला मराठी बोलावसं वाटतं, म्हणून तुला फोन केला. 'हे ऐकलं की माझ्या कानांना 'रजनीनाथ हा नभी उगवला...' असं ऐकल्यासारखचं वाटत व गहिंवरून येतं. माझं मराठी अगदीच कांही हरवलं नाहीये, याची पावती मिळते. माझ्या मराठीची मिणमिणती कां होईना पण ही पणती, इथल्या आधुनिकतेच्या निऑनच्या झगझगाटांत, काळाच्या वाऱ्यावादळांत तग धरून आहे, याची खात्री पटते.
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Dongari Awale An Vilayati Chincha डोंगरी आवळे अन विलायती चिंचा by Madhuri Bapat
Dongari Awale An Vilayati Chincha (डोंगरी आवळे अन विलायती चिंचा ) by Madhuri Bapat

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like