एक सॉफ्टवेअर एंजिनियर विचारतो : "आजच्या कॉम्प्युटरच्या युगात भावनेला काहीही अर्थ उरलेला नाही. कॉम्प्युटर भावना, भक्तिभाव वगैरे काहीही ओळखत नाही. तुमचा तो भक्तिमार्ग आज पूर्णपणे 'आऊटडेटेड' झालेला आहे. कॉम्प्युटर पुढे भक्तिमार्ग हरला आहे, हे तुम्ही का मान्य करीत नाही ?"एक भक्तिमार्गी विठ्ठलभक्त उत्तर देतो'भाव तोचि देव' असं एकनाथ महाराज ठासून सांगताहेत, ते काही उगीच नाही. जरा डोळे उघडा आणि चौफेर बघा, म्हणजे कोण हरला आहे हे तुम्हांला कळून येईल. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादि सर्व ठिकाणी विठ्ठलाची भजनी मंडळ स्थापन झाली आहेत! अखंड भक्ती आणि भजन तिथं चालू आहे. इतकंच काय पण युक्रेन मधली मुस्लीम मंडळीही भजन करीत आहेत! भक्तिमार्ग हा कॉम्प्युटर युगाचा 'रिव्हर्स इफेक्ट' आहे... जों जों विज्ञानाचा प्रभाव वाढत जाईल, तों तों त्याच्या हजार पटीनं भक्तिभाव हा वाढत जाईल. कारण विज्ञानाला किंवा बुद्धिवादाला मर्यादा आहे. पण भक्तिप्रेमाला कसली मर्यादा ? भक्तीची व्याख्याच परमप्रेम अशी आहे : 'सा तु अस्मिन् परमप्रेमरूपा' त्यामुळे तुमचा कॉम्प्युटरच शेवटी हरणार आहे! नव्हे, हरलाच आहे! आणि भक्तिमार्गच नेहमी जिंकणार आहे! नव्हे जिंकलाच आहे!- स्वामी धर्मव्रत