Skip to product information
1 of 2

Divyangamitra Sanganak (दिव्यांगमित्र संगनक) by Dr Deepak Shikarpur

Description

  अपंगत्व मग ते मानसिक असो की शारीरिक कोण्याही सजीवाला लाक्षणिक अर्थानेही पांगळे करून टाकते ह्यात शंकाच नाही. सध्याच्या जमान्यात मात्र ह्यांना मदत करायला संगणकीय नवतंत्रज्ञान पुढे सरसावले आहे. संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन्स त्यांमधील ऍप्स व तत्सम सुविधा आणि 'वेअरेबल्स' ह्यांनी अपंगांना अक्षरशः मदतीचा हात दिला आहे, तोही तुलनेने कमी खर्चात अधिक सोयी पुरवून. संगणकीय नवतंत्रज्ञानामुळे अपंगांच्या सामाजिक, कौतुंबिक (आणि मुख्य म्हणजे) आर्थिक स्थितीत खूपच सकारात्मक फरक पडला आहे हे नक्कीच. कुशाग्र बुद्धीच्या परंतु शारीरिक मर्यादांमध्ये जखडलेल्या व्यक्तीला संगणकीय तंत्राचे सहाय्य मिळण्याचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे थोर संशोधक स्टीफन हॉकिंग. त्यांच्या मेंदूतील विचारप्रक्रिया समजून घेणे आज आपल्याला शक्य झाले आहे ते निव्वळ संगणकीय उपकरणांमुळेच अन्यथा हॉकिंग ह्यांच्या प्रखर - बुद्धिमत्तेचा लाभ इतरांना कधीच मिळू शकला नसता !!• आपले अपंगत्व ही आपलीच काहीतरी चूक किंवा त्रुटी आहे आणि आपण फक्त इतरांवरचे निरुपयोगी ओझे बनलो आहोत... "ही भावना बहुतेक विकलांगांना आतून त्रास देत असते. निदान नवतंत्रज्ञानाशी परिचय करून घेतल्यामुळे आयुष्यात कसा व किती सकारात्मक फरक पडणे शक्य आहे. हे जाणवले तर त्यांच्या मनाला नवी उभारी मिळेल..." हे पुस्तक लिहायचा हाच खरा हेतू आहे.डॉ. दीपक शिकारपूर deepakshikarpur@yahoo.com  
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Divyangamitra Sanganak दिव्यांगमित्र संगनक by Dr Deepak Shikarpur
Divyangamitra Sanganak (दिव्यांगमित्र संगनक) by Dr Deepak Shikarpur

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like