जेव्हा आपण ध्यानात जातो, आपल्या चैतन्याचा थेंब ब्रह्मात विलीन होतो, तेव्हा आपण कुठंच असत नाही. आणि जेव्हा आपण कुठंच असत नाही तेव्हा त्याच वेळी शांतीचा जन्म होतो, आनंदाचा अन् अमृताचा जन्म होतो.आपण जोवर आहोत तोवर दु:ख आहे, तोवर पीडा आहे. जोवर आपण आहोत, परेशानी आहे. आपलं असणंच अँग्विश आहे, संताप आहे. आपला अहंकारच सगळ्या दु:खाचं मूळ आहे. जेव्हा आपण म्हणू की मी कुठंच नाही किंवा सर्वत्र आहे, त्याच क्षणी आनंदाचा उगम स्रोत सुरू होतो.-ओशो