विंदा करंदीकर यांच्या या कवितासंग्रहात कधी शब्दांचा भावनानिष्ट क्रम वापरून, कधी भावानुसारी अनुप्रास व नव्या शब्दसंहती निर्माण करून, तर कधी लयींतील आघात, विराम, उत्सेक या तत्त्वांचा अभिनव उपयोग करून विलक्षण प्रभावी अभिव्यक्त साधतात. जुने घाट नव्या आशयाला सक्षम करून वापरतात. तर नवे वास्तव, नवे विचार, नवा जीवनानुभव मराठी रक्तात भिनलेल्या अभंगात मांडून प्रयोगाचा परंपरेशी सांधा जुळवतात. घाट व भाव यांतील तणाने प्रभावित झालेली ‘धृपद’तील त्यांची कोणतीही कविता वाचली की, कवितेचे नित्य नवे सामर्थ्य प्रत्ययाला आणणार्या त्यांच्या उद्दाम प्रतिभेचा भारावून टाकणारा अनुभव येतो आणि कवितेच्या नव्या उन्मेषावरील विश्वास दृढावतो.